करमाळा : करमाळा येथे अनंत चतुर्दशी व ईद ए मिलादनिमित्त जामा मस्जिद जमात ट्रस्ट व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने मुख्य मार्गावर येणाऱ्या गणेश मंडळांवर जामा मस्जिद वेताळ पेठ येथे मुस्लिम समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. श्रीदेवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाच्या श्री गणेश मिरवणूकीचे स्वागत करुन फुलांचा पुष्पहार घालून पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्तेचे फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांचा माजी नगराध्यक्ष युसुफ नालबंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल सावंत, सोमाशेठ चिवटे, प्रशांत ढाळे, संजय सावंत, तानाजी जाधव, प्रवीण कटारिया, नितीन घोलप, राजेंद्र घाडगे, बाळासाहेब क्षीरसागर, सचिन घोलप, संतोष वारे, विजय लावंड उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मस्जिद ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष जमीर सय्यद, माजी नगरसेवक फारुक जमादार, जामा मस्जिदचे सदस्य उस्मान सय्यद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशनचे सचिव रमजान बेग, रहनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरज शेख, मंडळ अधिकारी युसुफ बागवान, उपाध्यक्ष जहागीर बेग, पत्रकार नासीर कबीर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आझाद शेख, मुस्तकीम पठाण, दिशान कबीर, मजहर नालबंद, आरबाज बेग आदी उपस्थित होते.