करमाळा (सोलापूर) : श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी नेताजी सुभाषचंद्र विद्यालय व ज्युनियर कॉलेजला 25 फायबर खुर्च्या भेट दिल्या आहेत. शुभ्रा खाटमोडे हिच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही भेट दिली आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॕड. संतोष निकम, हरिश्चंद्र खाटमोडे, प्राचार्य मुलानी सर, पर्यवेक्षक श्री. बुरुटे, श्री. महानवर, श्री. जाधवर, श्री. मदने यावेळी उपस्थित होते. यावेळी अॕड. निकम म्हणाले, शुभ्रा हिने जसे तिच्या पालकांना आग्रह करून शाळेसाठी काही भेट वस्तू द्या तसे सर्वच मुलांनी तिचा आदर्श घेतला तर शाळेला काहीही कमी पडणार नाही. आम्ही ग्रामस्थ देखील सगळे शाळेच्या विकासासाठी तुमच्या सोबत राहू. आभार श्री. पवार यांनी मानले.


