करमाळा (अशोक मुरूमकर) : विकासाची दृष्टी ठेऊन कोणी कोणतीही मागणी करता करमाळा शहरासाठी निधी मिळवला आहे. आपण अडचणी मांडल्यातर आणखी चांगली कामे करता येतील, असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे.

माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळ्यातील व्यापाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विवेक येवले, शिवसेना (शिंदेगट ) जिल्हा प्रमुख महेश चिवटे, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, बाजार समिती व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय दोशी, सराफ संघटनेचे अध्यक्ष राधेशाम देवी, खाते बी बियाणेचे अध्यक्ष महावीर सोळंकी, कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पप्पूशेठ सिंधी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप, किरण बोकन, सुहास घोलप, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे यांच्यापुढे चिवटे यांनी शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला असून पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत १० टँकर सुरु करण्याची मागणी केली. शहरात कचरा वेळेवर उचलला जात नसून प्रशासन याकडे गांभीर्याने पहात नसल्याची तक्रार केली. आमदार शिंदे म्हणाले, करमाळा शहराची विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणी काहीही मागणी न करता विकासाची दृष्टी ठेऊन मी काम करत आहे, करमाळा शहराच्या हद्दवाढ भागाचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखडा केला आहे. शहरातील विकासाची कामे मार्गी लागावीत म्हणून पाठपुरावा सुरु आहे. सरकार बदलल्यामुळे काही कामांवर स्थगिती आली होती. स्थगिती उठल्याने कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला, असल्याचे त्यांनी सांगितले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *