MLA Sanjay Shinde visited 22 villages during the day to campaign for Nimbalkar

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शनिवार) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील 22 गावांना भेटी दिल्या आहेत. या दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार शिंदे यांनी पारेवाडी, केतूर नं.1, केतुर नं.2, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, कुंभारगाव, हिंगणी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, दिवेगव्हाण, सावडी, कोर्टी, विहाळ, वीट या गावांना भेट देऊन गावाच्या विकासासाठी मतदारांनी महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

सकाळी 8 वाजता पारेवाडी येथून या दौऱ्यास सुरुवात झाली. समारोप रात्री वीट येथे झाला. सूर्यकांत पाटील, डॉ. गोरख गुळवे, सुहास गलांडे, ऍड. अजित विघ्ने, बाळकृष्ण सोनवणे, तानाजी झोळ, राजेंद्र धांडे, सुजित बागल, राजेंद्र बाबर, हनुमंत पाटील, शंकर जाधव, बी. एन. जाधव, ऍड. अशोक गिरंजे, अनिल शेजाळ, पांडुरंग नवले, गणेश गुंडगिरी, अविनाश मोरे, औदुंबर मोरे, गौरव झांजुर्णे, संतोष वारगड, अजित रणदिवे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *