Government Semi Government and Private Offices are called upon to fill the quarterly statement of manpower

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कार्यालय यांनी त्यांच्याकडील सप्टेंबर 2023 कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई- आर- 1) 31 ऑक्टोबरपर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त ह. श्री. नलावडे यांनी केले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व त्याखालील नियमावली 1960 मधील कलम 5 (1) (शासकीय आस्थापनांसाठी) 5(2) (खाजगी आस्थापनांसाठी) अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0217-2950956 वर संपर्क साधावा. असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त श्री. नलावडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *