Tomorrow online employment fair for unemployed candidatesTomorrow online employment fair for unemployed candidates

सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत उद्या (गुरुवारी, ता. 19) पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त एच.एस.नलावडे यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, ट्रेनी, आयटीआय, वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, स्टाफ नर्स, ऑफिस असिस्टंट, पदवी, इलेक्ट्रीशीयन, मशिन ऑपरेटर अशा प्रकारची एकूण 450 पेक्षा जास्त रिक्त पदे उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://roigar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त श्री.नलावडे यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *