करमाळा (सोलापूर) : किल्लावेस ते सदरा (फुलसौंदर) चौक दरम्यान वेताळ पेठेतील दोन्ही बाजूंची काँक्रीट गटारे बांधण्याच्या कामाचे आज (गुरुवारी) भूमिपूजन झाले. करमाळा नगरपालिकेचे नगररचनाकार शशांक भोसले यांचे हस्ते व सार्वजनिक बांधकाम उपविभागचे स्थापत्य अभियंता संदीप नवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी यासाठी २० लाख निधी मंजूर केला होता. माजी आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या कामाचा शुभारंभ झाला. मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नितीनराजे भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ऍड. शिवराज जगताप, अशपाक जमादार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, तालुकाध्यक्ष किरण फुंदे, तालुका कार्याध्यक्ष सुजित बागल, तुषार शिंदे, सूरज ढेरे, सचिन वैकर, उदय येवले, राहुल वनारसे, प्रफुल्ल शिंदे, सागर गायकवाड, उद्धव वीर, राष्ट्रवादी महिलाच्या नंदिनी लुंगारे, तालुका उपाध्यक्ष सौ. शिंदे, प्रकाश माने आदी यावेळी उपस्थित होते.



