Guidance camp on micro food processing industry scheme at RavgaonGuidance camp on micro food processing industry scheme at Ravgaon

करमाळा : तालुक्यातील रावगाव येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर झाले. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून याचे उद्घाटन झाले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, कृषी विभागाचे मनोज बोबडे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.

चिवटे म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना चांगली आहे. याचा तरुण, शेतकरी युवक महिला बचत गटाचे सदस्य यांनी लाभ घेऊन गावातच रोजगार निर्माण करावा. या योजनेच्या माध्यमातून ३५ टक्के अनुदान दिले जाते, असेही त्यांनी सांगितले. माजी सरपंच दादासाहेब जाधव, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, गोवर्धन करगळ, माजी ग्रामपंचायत सदस्य दासा बरडे, भाजप तालुका उपाध्यक्ष आजिनाथ सुरवसे, उपसरपंच काका पवार, प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे, राष्ट्रवादीचे गणेश कांबळे, राजाभाऊ पवार, आपक्षचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्कर पवार, भाऊसाहेब करगळ, रहमान शेख, शहाजी सुरवसे, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बुधवंत, अतुल पवार, कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर खाडे, हनुमंत लोंढे, पप्पू पवार, लखन पवार, अमोल पवार, राहुल गोसावी, पंडित नागवले, प्रल्हाद कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले तर आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *