करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व येथील हभप गोरख यशवंत सरडे (वय ८५) यांचे निधन झाले आहे. ते देहुकर महाराज गडावरील देहुकर महाराजांचे चोपदार होते. मंगळवारी (ता. २१) दुपारी १३:३० वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत पंचक्रोशितील ग्रामस्थ, वारकरी उपस्थित होते. त्यांची अंत्ययात्रा संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर व श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली. करमाळा एसटी आगारात कार्यरत असलेले श्री. सरडे यांचे ते वडील होते.

