करमाळा (सोलापूर) : वांगी नं. 3 येथे शिवजयंतीनिमित्त आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत व जेऊर येथील आनंद पतसंस्थाच्या वतीने सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये 250 रुग्णांची रक्तदाब, शुगर HB यांची तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. यासाठी डॉ. गजानन गुंजकर व डॉ. कोमल शिर्के यांनी मार्गदर्शन केले. डॉ. शारदा सुराणा, डॉ. टोणपे, डॉ. बबन चौधरी, डॉ. पंकज भोसले यांनी यासाठी सहकार्य केले.
विठ्ठल मंदिर येथे ‘वाढते हृदयरोग अर्धांग वायू उच्च रक्तदाब शुगर’ या रोगांवरील कारणे व उपाय यावर डॉ. सुभाष सुराणा यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विठ्ठल पवार यांनी हृदयरोग बाबत माहिती दिली. यावेळी नवीन कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच मयूर रोकडे, उपसरपंच संतोष कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शंकर जाधव, सोमनाथ रोकडे, चंद्रकांत कदम, सुखदेव सातव, आनंद पतसंस्थेचे सचिव भारत रोकडे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, शुभम रोकडे, विक्रम बेंद्रे, राहुल रोकडे, बापूराव शिंदे, सोनाज काळे, विकास वाघमोडे, दिनकर रोकडे, रवीदादा रोकडे, अशोक कात्रेला, बंडू सुतार, राजाभाऊ देशमुख, पोलिस पाटील गहिनाथ शिरसागर, किसन सोनवणे, डॉ. विजय रोकडे, मारुती रोकडे, रायचंद खाडे, जालिंदर पांढरमिसे, मोहन सोनवणे, सुनील भोईटे, भारत तावसे, हनुमंत गुटाळ, बापूराव भानवसे, जयवंत कदम यांनी प्रयत्न केले.