सोलापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही बँकांकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे विविध कारणास्तव परस्पर कपात केले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांना संबंधित लाभार्थ्याचे बँक खात्यावरील पैसे कपात करू नये, याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लाभार्थ्यांचे बँक खात्यातून पैसे कपात झाले असतील तसेच या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक खालील प्रमाणे देण्यात येत आहेत….

माढा : संरक्षण अधिकारी उज्वला कापसे मो. 8308273114, विस्तार अधिकारी बंडु खेताडे मो. 7030384711 व विस्तार अधिकारी आकाश कोकाटे मो. 7030384711
बार्शी : विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले मो. 8208213921, विस्तार अधिकारी सुरज काटकर मो. 8208213921
उत्तर सोलापूर : संरक्षण अधिकारी अविनाश जेठीयार मो. 8698475808, विस्तार अधिकारी रवि पाटील मो. 7588046259
मोहोळ : संरक्षण अधिकारी उज्वला कापसे मो. 8308273114, विस्तार अधिकारी शिलादेवी दाढे मो. 9975567732
सांगोला : संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण मो. 7875693241, विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड मो. 8421910928,
करमाळा : संरक्षण अधिकारी मिथुन पवार मो. 9527341147, विस्तार अधिकारी संदिप रणदिवे मो. 7387294383
माळशिरस : संरक्षण अधिकारी पी. एस. वावरे मो. 8788158230, विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे मो. 9637983739
पंढरपूर : विस्तार अधिकारी अनंत शिंदे मो. 9049529797, विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार मो. 8275303173
दक्षिण सोलापूर : विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव मो. 8600798899, संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे मो. 9049113282
अक्कलकोट : विस्तार अधिकारी मृणाली शिंदे मो. 9420358355, संरक्षण अधिकारी एस. एस. कलशेट्टी मो. 9665673745
मंगळवेढा : पर्यवेशीका अनुराधा शिंदे मो. 9423591049, संरक्षण अधिकारी आर. आय. विजापूर मो. 9326527044.

माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *