करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी मिळवल्यानंतर भाजपच्या नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी प्रभाग मध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्यांचे चिरंजीव सचिन गायकवाड यांनी या भागातील मुख्य ठिकाणे स्वच्छ करून घेतली आहेत. याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील नाल्याचीही स्वच्छता करण्यात आली आहे. गायकवाड यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार प्रभागात काम सुरु केले आहे. या प्रभागातील सर्व प्रश्न सोडवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी होताच प्रभाग तीनमध्ये स्वच्छतेचे काम सुरु
