कंदर येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून एकाला पाचजणांकडून मारहाण

Fraude de una mujer en nombre del lavado de oro Robo de una tolas y media de oro metiéndose algo en los ojos captado en CCTV

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून एकाला मारहाण झाली आहे. यामध्ये पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरीला गेला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. बबन दत्तू माने, केशव बबन माने, बालाजी बबन माने, अक्षय अमरनाथ माने व निखील अंबरनाथ माने (सर्व रा. कंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये दत्तात्रय सोपान रोकडे (वय ४२, रा. कंदर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी रोकडे यांची दूध डेअरी व शेती आहे. गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी व त्यांची शेती शेजारी आहे. १२ तारखेला त्यांच्यात शेतातील रस्त्यावरून वाद झाला आहे. त्यांनी दमदाटी करून मारहाण केली आहे. काठीने मुक्का मार देऊन त्यांनी ही मारहाण केली आहे. दुकानात कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले एक लाख रुपये व सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. यामध्ये फिर्यादी जखमी झाले होते. त्यांना टेंभुर्णी येथे एका रुग्णालयात दाखल केले होते. तेथून करमाळा पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *