मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची ओळख करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच पावसाळी अधिवेश आहे. याचा आज पहिलाच दिवस असून विधानपरिषदेत फडणवीस यांनी मंत्र्यांची ओळख करून दिली. यावेळी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्षेप घेत विरोधकांनी आवाज उठवला. यावेळी विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदेत विरोधकांनी सभात्याग केला आहे.

