करमाळा (सोलापूर) : केएफसी ॲग्रो सर्विसेसच्या वतीने जेऊर येथे नेटाफिम ठिबक, सह्याद्री टिशू कल्चर केळी रोपे व चोपिंग बनाना केळी मोडायचे मशीन, माती- पाणी व देठ परीक्षण केंद्रचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्हा व्यवस्थापक अधिकारी मल्लिनाथ जट्टे, दयानंद वीर, तुषार निकम, मल्लिनाथ जट्टे, बापूराव तनपुरे, योगेश कर्णवर, संजय तनपुरे, अनिल कोकाटे, सिद्धेश्वर मस्कर, प्रशांत पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

