करमाळा (सोलापूर) : तालुक्यात कुकडीच्या ओहोरफ्लोचे पाणी दाखल झाले असून नागरिकांनी दिवटेवाडी, त्रिंबक पाटील वस्ती व कुस्करवाडी चारीवर आखाडे वस्ती येथे या पाण्याचे पूजन केले आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यात येत होते मात्र पोंधवडी चारीचे काम पूर्ण नसल्यामुळे अनेक गावे वंचित होती. निधीअभावी 2009 पासून हे काम रखडले होते. या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी, गोरेवाडी, हुलगेवाडी, कुस्करवाडी, राजुरी, वीट, अंजनडोहच्या नागरिकांचा या कामासाठी पाठपुरावा सुरु होता.
आमदार संजयमामा शिंदे यांनी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना पाणी आणण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्ती 2023 मध्ये झाली आहे. पोंधवडी चारीसाठी 9 कोटीचा निधी प्राप्त झाल्यामुळे या चारीवरील सर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्षात ओव्हरफ्लोचे पाणी या चारीवरून सुरू झाले आहे. कुस्करवाडी चारीवर आखाडे वस्ती नजीक महिलांनी आज (शुक्रवारी) या पाण्याचे पूजन केले. यावेळी संगीता आखाडे, शालन आखाडे, तनुजा पाटील, सविता आखाडे, काशिनाथ आखाडे, कल्याणी आखाडे, शिवाजी पाटील, शकर राऊत, नवनाथ आखाडे, राजू आखाडे, रेवन्नाथ आगलावे, भाऊसाहेब आखाडे, रविंद्र आखाडे, सोनू आखाडे, आदिनाथ आखाडे, सागर आखाडे आदी उपस्थित होते.
त्रिंबक पाटील वस्तीवरील शेतकऱ्यांनीही पाणी पूजन केले. यावेळी मधूकर गावडे, संभू गावडे, दादा गावडे, मोहन शिरसकर, विजू गावडे, सलीम शेख, शंकर राऊत, शिवाजी पाटील, राजू आखाडे, रवि आखाडे, सोनू आखाडे, शाहरुख पठाण उपस्थित होते. हवालदार वाडीजवळ स्वाती हजारे, सारिका हजारे, लक्ष्मी हगारे, प्रगती हगारे, अंजना माळवे यांनी पाणी पूजन केले. कोर्टीचे माजी उपसरपंच सुभाष अभंग, शिवाजी गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गावडे, विकास गावडे, जिजाबा हगारे, आकाश जाधव, शशिकांत गावडे, धनाजी गावडे, उमेश हगारे, संदीप हगारे, रावसाहेब हगारे, छगन माळवे, संजय जाधव, बाबासाहेब चव्हाण, संजय गावडे, दिगंबर हगारे, आदित्य हगारे, संदीप गावडे, जनार्दन गावडे उपस्थित होते.
दिवटेवाडी येथे महिलांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले तर शेतकरी बंधूंनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी निलकंठ तात्या अभंग, मारूती घोगरे, नागेश जाधव, संतोष झाकणे, गोरख शेलार, तुकाराम साबळे, बापू बोराडे, काका डबडे, लाला गाढवे, काका डबडे, बाबुराव जाधव, महेश शितोळे उपस्थित होते.