करमाळा शिक्षक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, पंचायती समितीचे माजी सभापती अतुल पाटील, ऍड. राहुल सावंत, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, आदिनाथचे संचालक देवानंद बागल, बिभीषण आवटे, महादेव फंड आदींसह शिक्षक समिती व पेन्शन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या पतसंस्थेचे ६३५ प्राथमिक शिक्षक सभासद असून कर्जमर्यादा १५ लाख व व्याजदर ८.४० टक्के आहे. मुदत ठेवीसाठी ८ टक्के व्याजदर दिला जातो. मोबाईल ॲप सुरू करणारी ही जिल्ह्यातील पहिली पतसंस्था आहे. ५ लाख रुपयांची मयत निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अरुण चौगुले यांनी केले. यावेळी प्रताप काळे, आदिनाथ देवकते, तात्यासाहेब जाधव, साईनाथ देवकर, अजित कणसे, सतीश चिंदे, वैशाली महाजन, पूनम जाधव, हनुमंत सरडे, निशांत खारगे, भारत भानवसे, लालासाहेब शेरे आदी संचालकांसह सहसचिव रमेश नामदे, बाळासाहेब दुधे, वसंत बदर, दीपक जाधव आदी उपस्थित होते. कुंडलिक केकान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर साईनाथ देवकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *