उंदरगावमध्ये विविध विकास कामांचे उदघाटन

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथील कांबळे वस्ती क्र. 2 येथे दलित वस्ती सुधार योजनामधून ओरो फिल्टर व काँक्रेट रस्ता या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी ग्रामपंचायत सदस्य धनंजय कांबळे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे विकास कामांची मागणी केली होती. या विकास कामाचे उद्घाटन हरिदास कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी उंदरगावचे सरपंच युवराज मगर, उपसरपंच शिवाजी कोकरे, केशव कांबळे, लहू कांबळे, उंदरगाव सेवा सोसायटीचे चेअरमन शरद मगर, मकाईचे संचालक रेवण निकत, बापूराव कोकरे, धुळा कोकरे, जालिंदर कोकरे, श्रीकृष्ण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य समाधान कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य रामहरी गरदडे, प्रवीण कांबळे, सचिन कांबळे, महेश कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *