जेऊर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश

Inclusion of Jewar Railway Station in Amrit Bharat Yojana

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या मार्गावरील जेऊर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे जेऊर रेल्वे स्थानकास जास्तीत जास्त निधी मंजूर होणार आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

रेल्वे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, करमाळा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी, रवी माळवे यांनी सोलापूर येथे डी. आर. एम निरज डोहारे यांना भेटून जेऊर रेल्वे स्थानकास अमृत भारत योजनेअंतर्गत प्लॅटफॉर्म निवारा शेड, कोच इंडिकेटर तसेच तिकीट खिडकी शेजारी दुसरा फुट ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा असे निवेदन दिले आहे. लवकरच जेऊर रेल्वे स्थानक हे प्रवासांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त होईल, तसेच तालुक्यातील प्रवाशांच्या प्रवासाठी सोयिची असणारी हुतात्मा एक्स्प्रेसला लवकरच थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *