ढेकळेवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा

Independence Day celebrated in Dheklewadi

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ढेकळेवाडी (पोथरे) येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा झाला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संतोष ठोंबरे होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी कवायत, मुलांची भाषणे, पंचप्रण शपथ, वृक्षलागवड, जागर योजनांचा असे विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शांतीलाल झिंजाडे, हरिश्चंद्र झिंजाडे, चंद्रकांत झिंजाडे, हभप अंजलीताई शिंदे, किसन झिंजाडे, भाऊसाहेब साळुंके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन रंदवे यांनी केले. आभार सहशिक्षक चंद्रकांत रोडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *