करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथे ९६ पायऱ्यांची विहीर परिसरात जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये रोख रक्कम व मोबाईल असा 1 लाख 19 हजार 130 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे यांनी फिर्याद दिली आहे.
सतीश मुरलीधर चोरमले, अनिल दिलीप शिंदे, रवींद्र बाळासाहेब सोरटे, अंकुश संपत सावंत (सर्व रा. श्रीदेविचामाळ), शिवाजी बलभीम गंगणे (रा. एसटी कॉलनी), प्रमोद तुकाराम हिंगसे (रा. नागोबा मंदिर), किरण अरुण धनवे (रा. सुमंतनगर) व अमित सोपान खैरे (रा. जेऊर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपी हे बेकायदा 52 पत्याचा मना नावाचा जुगार खेळत असताना पोलिसानी पकडले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल व रोख रक्कम असा एवज ताब्यात घेण्यात आला आहे.