Inspection of the site of the newly constructed Diksal bridge by the contractor

करमाळा (सोलापूर) : कोंढारचिंचोली ते डिकसळ या जुन्या रेल्वेलाईन शेजारी नवीन पुलाचे काम मंजूर होऊन निविदा अंतिम झालेली आहे. या पुलाचे काम करणारे ठेकेदार विजय पटेल व राहुल पटेल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पहाणी करून पुलाचे काम सुरु केले आहे. यावेळी कोंढारचिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंके उपस्थित होते. साळुंके यांच्या म्हणण्यानुसार नवीन पुलाच्या कामाबाबत चर्चा केली. पुलाचे पाईल टेस्टिंगच्या कामास प्राथमिक स्वरूपात सुरुवात झाली आहे. पुलाच्या कामासाठी लागणारा कार्यारंभ आदेश मिळताच पुलाचे कामासाठी प्रत्यक्षात सुरुवात होईल. सदरचे काम हे तीन वर्षात पूर्ण होणार आहे. हे काम 420 मीटरचे असून ११ मोऱ्यावर हा पुल असणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *