करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी शेलगाव क व सौन्दे शिवेवर जाऊन दहिगाव उपसासिंचन योजनेच्या उपचारीच्या कामाची पहाणी केली असून कामाचा आढावा घेतला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण कसे करता येईल, यावर भर देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागाचे नंदनवन होणार असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसासिंचन ही एक अतिशय महत्वाची योजना आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात शेती ओलिताखाली येणार आहे. शेतकरी सर्वांगीण दृष्ट्या विकसित होणार असून ही योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असून शेतीचे नुकसान होणार असल्यास त्याची पंचनामे करून भरपाई दिली जाणार आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

दहिगाव उपसासिंचन योजनेच्या उपचारीचे संपूर्ण काम अंडरग्राऊंड होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत नाही, मात्र ज्या शेतात पीक आहे, त्याचे नुकसान होत असून त्याची भरपाई दिली जात आहे. दहिगाव उपसासिंचन योजनेच्या २७ मायनर चाऱ्यांची कामे राहिली होती. ती काम करण्याचे काम सुरु आहे. आमदार शिंदे म्हणाले, चारीची कामे पूर्ण व्हावीत म्हणून महायुतीच्या सरकारने मंजूर केली आहेत. याचा फायदा तिसऱ्या मायनरमध्ये साधारण १९०० हेक्टरला होणार आहे. साधारण २७५ किलोमीटरपर्यंतचे चारीचे काम झाले आहे. मेन चारीपासून उपचारी तेथून पुन्हा त्याची विभागणी होत आहे. ‘पीडीएन’मुळे ही योजना लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल यावर आमचा भर आहे. यामुळे पाणी बचत होणार आहे. बचत झालेल्या पाण्याचेही आपण नियोजन केले आहे. त्यामुळे ओलिताखाली येणारे क्षेत्र वाढणार आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, हे काम करताना भूसंपादनाचे विषय पुढे आले नाहीत. जलवाहिनेद्वारे पाणी असल्याने शेतीचे नुकसान होणार नाही. हे काम करताना पाऊस झाल्यानंतर काही ठिकाणी अडचण येईल, मात्र त्यावेळी जेथे चिखल होणार नाही तेथे आपण हे काम करणार आहोत. शेतीचे नुकसान होणार नाही म्हणून कृषी विभागामार्फत पंचनामा करून अहवाल दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी पाठबंधारे विभागाचे अभियंता श्री. अवताडे, शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल, शेतकरी केशव दास, उमेश वीर, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, डॉ. विकास वीर, तुषार शिंदे, सूरज ढेरे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *