केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्सच्या (ISH) वतीने ‘हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर आणि कोस्टल इंजिनिअरिंग : HYDRO 2024 इंटरनॅशनल’ या २९ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. तीन दिवसीय परिषदेमधे हायड्रोलिक्स, जलस्रोत, नदी अभियांत्रिकी आणि किनारपट्टी व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर आमंत्रित व्याख्याने, संशोधन पेपर सादरीकरण तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपायांना पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

सी. आर. पाटील, जलशक्ती मंत्रालय यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे HYDRO 2024 चे उद्घाटन केले. राष्ट्रीय प्रमुख प्रकल्पांमध्ये CWPRS च्या योगदानाचा उल्लेख केला. जलशक्ती मंत्रालय सचिव देबश्री मुखर्जी यांनी ही व्हिडीओ संदेशाद्वारे जल परिषदेस शुभेच्छा दिल्या. इंडियन सोसायटी ऑफ हायड्रोलिक्स (ISH) चे उपाध्यक्ष प्रो. एच. एल. तिवारी यांनी शास्त्रज्ञांना हायड्रोलिक्समधील नवीनतम घडामोडींची माहिती देण्यासाठी सेमिनार, कॉन्फरन्स आणि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ISH च्या महत्त्वावर भर देत सहभागींना संबोधित केले. ISH पुरस्कार जसे की ISH जीवनगौरव S. N. गुप्ता स्मृती व्याख्यान, प्रा. आर. जे. गार्डे संशोधन पुरस्कार, आयएसएच जर्नल रिव्ह्यूअर अवॉर्ड, जल विज्ञान पुरस्कार (आयएसएच जर्नलमधील सर्वोत्कृष्ट पेपर), आयएसएच सर्वोत्कृष्ट पीएचडी थीसिस पुरस्कार इत्यादींचे वितरणही करण्यात आले.

यंदाचा इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्स (आय एस एच) जीवनगौरव पुरस्कार CWPRS चे माजी सहसंचालक, ISH चे माजी अध्यक्ष प्रमोद देवळालीकर यांना देण्यात आला. जे चंद्रशेखर अय्यर, माजी अध्यक्ष, केंद्रीय जल आयोग यांनी उपस्थितांना जल क्षेत्रातील वास्तविक जीवनातील समस्या आणि त्यावरील उपायांचे महत्त्व सांगितले तसेच 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या धरणांमधील आव्हाने सोडवण्यासाठी ISH चे महत्त्व देखील नमूद केले. पृथ्वी विज्ञान मंत्रालय, सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी सहभागींना संबोधित करून जल व्यवस्थापन उपायांमध्ये बहु-अनुशासनात्मक सहकार्याचे महत्त्व सांगितले.

या वेळी जल परिषद २०२४ ची स्मरणिका आणि केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या सुधारित संकेत स्थळाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या परिषदेत ३५० संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. संशोधन केंद्राचे अतिरिक्त संचालक आणि जल परिषद आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रभात चंद्र यांच्या आभार प्रदर्शनाने उद्घाटनाचा समारोप झाला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *