Officials meeting in Karmala on Monday to get 18 facilities in 30 villages rehabilitated due to Ujani damOfficials meeting in Karmala on Monday to get 18 facilities in 30 villages rehabilitated due to Ujani dam

करमाळा (सोलापूर) : मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या जातेगाव ते टेंभुर्णी या 60.12 किलोमीटर लांब असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम होणार असून हे काम BOT तत्त्वावर होणार आहे. या प्रकल्पासाठी 935.66 कोटी खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाच्या टेंडर प्रक्रिया संदर्भात श्री. एन.एल. यवतकर महाव्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहीने 11 डिसेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.


याविषयी अधिक माहिती देताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा व संवेदनशील विषय होता. या महामार्गावरती आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातामध्ये जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा अधिक लोक जखमी झालेले आहेत. हा रस्ता महाराष्ट्र शासनाकडे होता तो रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे हस्तांतरित होण्यासाठी आपण शासन दरबारी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ना हरकत दाखल दिला.
हा रस्ता प्राधिकरण कडे हस्तांतरित झाल्यामुळे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे आता महामार्ग प्राधिकरण कडून केले जाणार आहे ही करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे .ऑनलाईन पोर्टलवरून 11 डिसेंबर पासून या कामाचे टेंडर भरता येणार आहेत त्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2024 आहे .टेंडर भारतीय प्रमाणवेळेनुसार 30 जानेवारी 2024 रोजी 11.30 वाजता उघडले जाईल .या रस्त्यामुळे करमाळा तालुक्याचा नगर व सोलापूर या जिल्ह्यांशी जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे तसेच मध्य रेल्वे व राष्ट्रीय महामार्गालाही करमाळा जोडले जाणार आहे. या रस्त्याचे काम मंजूर करण्यास महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *