करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोंधवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचदी बागल गटाच्या कांताबाई गाडे यांचा विजय झाला आहे. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक शेंडे यांनी पाहिले. विशाल अनारसे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणुक झाली. त्यामध्ये बागल गटाच्या गाडे यांचा 5- 4 मताने विजय झाल्या. निवडणुकीमध्ये अमोल गाडे, रामदास गाडे, सुदाम क्षीरसागर, वसंत भिसे, बाप्पू पांढरकर, किसन अनारसे, पिनू कोडलिंगे, नामदेव कोडलिंगे, रेवन राऊत यांचे योगदान मोलाचे ठरले.



