करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आली. छत्रपती चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर हजारो शिवभक्तांनी गर्दी केली. सायंकाळी मोठ्या उत्सहात करमाळा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणाई डीजेच्या तालावर धारकली.
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत लेझीम पथक व सहासी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. करमाळा शहरातील मुख्य मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या झेंड्यांमुळे संपूर्ण करमाळा शहर भगवेमय झाले होते. करमाळा शहारात किल्ला वेस, खंदक रोड, पोथरे नाका आदी ठिकाणी जयंती साजरा करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.