करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कमलाई, मकाईसह इंदापूर तालुक्यातील घागरगाव कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलासाठी संतप्त शेतकर्यांनी करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यात आळजापूर येथील शेतकर्यांची संख्या लक्षणीय होती. हा मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यानंतर त्याला सभेचे स्वरुप आले. दरम्यान पाऊस सुरु झाल्यानंतर मोर्चेकरी नायब तहसीलदार शैलेश श
निकम यांच्या दालनात आले. तेथे समाधानकारक चर्चा न झाल्याने संतप्त शेतकर्यांनी तहसील कार्यालयातच ठिया मांडला.
या मोर्चात बहुजन संघर्ष सेनेसह प्रहार, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी समाज पक्षाचे पदाधीकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मकाई व कमलाई कारखान्याच्या प्रतिनीधींनी मोर्चाकरांना माहिती सांगितली मात्र त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे हे घटनास्थळी आहेत.