करमाळा (सोलापूर) : येथील तहसील कार्यालयासमोर महिला अत्याचार विरोधी कृती समीतीच्या वतीने मणीपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. आज (शुक्रवारी) हा निषेध करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी अॅड. सविताशिंदे यांनी या प्रकारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. महिलांना निवस्र करुन त्यांची दींड काढली जाते तरी पंतप्रधान तेथे जातही नाहीत ही दुर्दैवी प्रकार आहे, असे म्हणत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
गोवर्धन चवरे यांनीही मनोगत व्यक्त करत भाजप सरकारवर टीका केली. या प्रकारातून सर्व नागरीकांनी जागृत होऊन असा प्रकार घडवणार्या जबाबदारांना धडा शिकवला पाहीजे, असे ते म्हणाले. याप्रकारामुळे मणीपूर सरकारचा त्यांनी निषेध केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
शेतकरी संघर्ष समितीचे दशरथ कांबळे म्हणाले, समाजात असलेली अशी विकृती नष्ठ केली पाहीजे. वेळीच असे प्रकार थांबले नाही तर अशा घटना आपल्यकडेही होतील. त्यामुळे याचा आता बंदोबस्त केला पाहिजे असे म्हणत मनोहर भिडे, पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नलिनी जाधव, अॅड. योगेश शिंपी, शितल क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्त्या निलावती कांबळे, नितीन खटके, उतरेश्वर कांबळे, राजश्री कांबळे, प्रविण होगले, जिवन होगले, अॅड. गोवर्धन चवरे, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप, मराठा सेवा संघाचे सचिन काळे आदी उपस्थित आहेत.