The gang that broke the ATM is a foreigner Police call for vigilance

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे आयडीबीआय बँकेचे चोरट्यांनी एटीएम फोडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही टोळी परप्रांतीय असल्याचा संशय असून पोलिस अधिक्षक शीरिष सरदेशपांडे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पोलिस अधिक्षक सरदेशपांडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेवर संदेश देत म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात एटीएम फोडणारी परप्रांतीय टोळी आली आहे. ही टोळी रात्री एटीएम मशीनला टार्गेट करत आहे. एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लंपास करत आहे. हरियाणा पाशिंगच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर संशय असून त्यांचा शोध सुरु आहे. आपल्या परिसरात कोणत्याही एटीएममध्ये रात्रीच्यावेळी कोणी छेडछाड करत असले तर किंवा संशयास्पद जाणवत असले किंवा थांबून असले तर एखादे वाहन आजूबाजूला तर कृपया आपल्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *