ब्युटी पार्लरला जाते असे सांगून घरातून गेलेल्या मुलीला नेले पळवून

-

करमाळा (सोलापूर) : ‘ब्युटी पार्लरला जाते,’ असे सांगून घरातून गेलेल्या १७ वर्षाच्या मुलीला कशाचे तरी अमिश दाखवून पळवून नेले असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात घडला आहे. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सबंधित मुलगी ४ तारखेला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घरातून गेली होती. त्यानंतर ती घरात आली नाही. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी करमाळा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *