करमाळा (सोलापूर) : तालुक्यात रिक्त असलेल्या नऊ ठिकाणी कोतवाल भरती होणार आहे. त्याची आरक्षण सोडत आज (शनिवारी) तहसील कार्यालय येथे झाली आहे. प्रांताधिकारी समाधान घुटूकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र भोंग, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी श्री. पाटील आदी उपस्थित होते.
यामध्ये चिखलठाण/ कुगाव येथे (भ. ज. ड), पोमलवाडी/ केत्तूर येथे (अराखीव महिला), विहाळ (अराखीव), कात्रज (इतर मागास वर्ग), पांडे (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक), टाकळी (अराखीव), मलवडी (अराखीव), पारेवाडी (इतर मागास वर्ग महिला), कंदर (अनुसूचित जमाती) असे आरक्षण असणार आहे.