करमाळ्यातील मोरे यांची मनसेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Nana More from Karmala was elected as the Solapur District Vice President of MNS

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील नानासाहेब मोरे यांची निवड झाली आहे. प्रदेश प्रवक्ते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथे त्यांना या निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संजय घोलप, सतीश फंड, अशोक गोफणे आदी उपस्थित होते. मोरे यांनी करमाळा शहर प्रमुख म्हणून प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हा उपाध्यक्ष करण्यात आले आहे.

मनसेच्या माध्यमातून मोरे यांनी विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला यांच्यावर होणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठून न्याय मिळवून दिला आहे. रस्ते, पाणी, वीज यासंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठीही त्यांचे काम सुरु असते. धोत्रे यांनी जिल्ह्यात मनसे मजबूत करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे विचार घरा घरात पोहोचण्याचे काम यापुढेही जबाबदारीने करणार आहे, असे मोरे यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देणार असु़न सध्या राजकीय परिस्थिती बघता विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला सामील झाले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक या साठ्या- लोट्याच्या राजकारणाला कंटाळला आहे. सर्वसामान्य नागरिकाचे स्वाभिमानी नेतृत्व असलेले ठाकरे यांचे नेतृत्व प्रभावी वाटत असून येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मनसे नक्कीच सत्ता मिळवणार असून सर्वसामान्य नागरिक मनसेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मनसे गावागावात पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *