करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय व सकल मराठा समाजच्या वतीने आज (शुक्रवार) सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत कुंभेज फाटा येथे ‘कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मेळावा’ होणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व सर्व महा ई सेवा केंद्र चालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार ठोकडे यांनी केले आहे. प्रमाणपत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन येथे उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
करमाळा तहसीलच्या वतीने आज कुणबी मराठा प्रमाणपत्र मेळावा
