Laxman Kekan as district coordinator of BJP Gaon Chalo Abhiyan

करमाळा (सोलापूर) : भाजपच्या ‘गाव चलो अभियाना’च्या सोलापूर पश्चिम ग्रामीणच्या जिल्हा संयोजकपदी लक्ष्मण केकान यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अभियानासाठी निवडणुकीच्या काळात त्यांनाही जबाबदारी मिळाली आहे. २४ तास एका गावात मुक्कामी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती घराघरात पोहोचवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. केकान म्हणाले, या अभियानात प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, लोकसभेचे निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक, लोकसभा संयोजक राजकुमार पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *