सोलापूर : श्री.क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकवारी यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ चा कलम १४२ (१) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन कार्तिक यात्रा उत्सव २०२३ कालावधीत मद्य विक्री मनाई आदेश जारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कार्तिक यात्रा उत्सव २०२३ निमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक २२.१९.२०९३ व दिनांक २३.११.२०२३ रोजी पंढरपूर शहरातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री, ताडी विक्री अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र विदेशी दारु (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.) नियम १९६९ चे नियम ९(अ) (२) (ब) (आठ) नुसार कार्तिकवारी यात्रा म्हणजेच दिनांक २३.११.२०२३ रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएलडब्ल्यू-२, नमुना ई-२, एफएलबीआर-२, सीएल-३, ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील. तरी जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारक व ताडी विक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.