Gram panchayat election results in karmala who will gain and who will loseGram panchayat election results in karmala who will gain and who will lose

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची सरपंच व सदस्यपदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच झाली आहे. निकालानंतर आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाने वेगवेगळे दावे- प्रतिदावे केले आहेत. मात्र येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार हे पहावे लागणार आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. बाजार समिती जगताप गटाच्या ताब्यात देण्यात आली. त्याचा परिणाम काही ठिकाणी दिसला. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सोईनुसार भूमिका घेऊन या निवडणुकीत उतरले. मात्र अपवाद सोडला तर गटाचे प्रमुख नेते थेट कोठेही दिसले नाहीत.

जेऊर, केम, चिखलठाण, कंदर, कोर्टी, वीट, रावगाव, निंभोरे, राजुरी, घोटी आशा मोठ्या गावांची ही निवडणूक होती. यामध्ये 16 पैकी उंदरगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. केम ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. येथे मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांची सत्ता आली आहे. मात्र सदस्य विरोधी गटाचे जास्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम दिसणार का? हे पहावे लागणार आहे. तळेकर यांना रोखण्यासाठी विरोधकांनी आखलेली रणनीती येथे यशस्वी झाली. मात्र केवळ एका प्रभागात सरपंच पदाच्या उमेदवाराला लीड मिळाला. त्यामुळे त्यांचा विजयी झाला. अन्यथा येथे वेगळे चित्र दिसले असते, अशी चर्चा आहे.

जेऊर ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे सरपंच झाले आहेत. पाटील गटाने येथील सत्ता अबाधित ठेवली आहे. याचा येणाऱ्या निवडणुकीतही काही परिणाम होईल असे चित्र नाही. म्हणजे पाटील गटासाठी याचा फायदा आहेच मात्र विरोधी गटावर मताधीक्य वाढण्यास मदत होईल असे चित्र नाही. कारण येथे पाटील गटाला मानणारा वर्ग मोठा आहे. शिवाय या निवडणुकीतील विजयामुळे तो विश्वास आणखी वाढणारच आहे. येथील निवडणुकीत पाटील गटाने विरोधकांना नगण्यच समजले होते. प्रचार सुरु असताना प्रातिनिधिक मतपत्रिकेचे जे फलक लावले होते. त्यात फक्त पाटील गटाच्याच उमेदवारांची नावे होती. त्यात विरोधी गटाची नावे सुद्धा त्यांनी वगळली होती. म्हणजे सुरुवातीपासून त्यांना या विजयाची खात्री होती. फक्त मताधिक्य किती वाढेल यावरच त्यांनी भर दिला होता, असे बोलले जात आहे.

चिखलठाणमध्ये शिंदे गटाचे समर्थक चंद्रकांत सरडे यांचा पराभव करण्यासाठी बागल व पाटील एकत्र आले. त्यात त्यांना यशही आले. मात्र शिंदे गटाचेच समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड हेही सरडे यांच्या विरोधात होते. सुरुवातीपासून ते सरडेंच्या विरुद्ध काम करत आहेत. गलांडे हे येथे विजयी झाले आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत बागल, पाटील व शिंदे गट वेगळे लढले तर कोणाला फायदा होणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

वीट ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाची विभागणी झाली होती. सरपंचपदावर विजयी झालेले महेश गणगे यांनाही शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले होते. त्यात शिंदे गटाचे समर्थक राजेद्रसिंह राजेभोसले गटाची सत्ता गेली. पाटील गटाचे येथे स्वतंत्र पॅनल होता. समाधान कांबळे हे त्यांचे उमदेवार होते. गणगे हे फक्त शिंदे गटामुळे विजयी झाले नाहीत, अशी येथे चर्चा आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत येथे शिंदे, पाटील की बागल गटाला फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

कंदरमध्ये जगताप गटाच्या उमेदवाराने शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. अण्णा पवार यांनी ही ग्रामपंचायत जगताप गटाची असल्याचा दावा निकालानंतर केला होता. येथेही कोणत्या गटाला फायदा होणार हे पहावे लागणार आहे. या निवडणुकांमध्ये पाटील गटाच्या ग्रामपंचायती सर्वाधिक आल्या आहेत, असा दावा आहे. तर शिंदे गटाने पाच ग्रामपंचायती एकहाती व तीन ग्रामपंचायतीमध्ये युती आघाडी असल्याचा दावा केला आहे.

कोणाला कसा फायदा होणार हे दुसऱ्या भागात
ग्रामपंचायत निवडणूक निकालामुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
करमाळा तालुक्यात शिंदे गट वाढत आहे सिद्ध झाले

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *