सोलापूर : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना प्रधान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन 2024 वर्षासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी सोमवारी 15 जानेवारी 2024 मकर संक्रांत, मंगळवार 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी व गुरुवारी 31 ऑक्टोबर 2024 नरक चतुर्दशी याप्रमाणे तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.



