करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते निंभोरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण झाले. निंभोरे ते कोंढेज रस्ता, निंभोरे ते घोटी रस्ता, स्मशानभूमी सुशोभीकरण, तलाठी कार्यलय, पाणंद रस्ता, यल्लमा देवी मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक व वॉल कंपाउंड, गवळी, जगताप, वाघमारे, वरकड, सावंत, मारकड, काशीद, सांगडे, वळेकर, शिंदे वस्तीकडे जाणारा कॅनॉल, बंदिस्त गटार, स्वच्छ भारत मिशन, वॉटर फिल्टर, आंबेडकर नगर पाणीपुरवठा करणे, आंबेडकर नगर पेव्हिंग ब्लॉक, अण्णाभाऊ साठे नगर पाणीपुरवठा करणे व जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती अशी कामे मंजूर आहेत. यातील काही कामांचे भूमिपूजन व काही कामांचे लोकार्पण झाले.

यावेळी चंद्रकांत सरडे, विलास पाटील, राजेंद्र बारकुंड, सुजित बागल्, सरपंच रवी वळेकर, अशोक वळेकर, चेअरमन संतोष पाटील, उपसरपंच धनंजय वळेकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य समाधान वळेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य अरुण वळेकर, बाप्पा शहाजी, शहाजी काळदाते, पप्पू म्हस्के, दिनेश वळेकर, दत्ता वळेकर, अक्षय वळेकर, नाथा शिंदे, सोमा गुरव, गणेश वळेकर, अण्णा वळेकर, बिबीशन फरतडे, अमोल वळेकर, सुभान फरतडे, ज्योतीराम वळेकर, हभप अमोल काळदाते, बापू मोरे, बाळू सांगळे, अर्जुन काळदाते, दशरथ वळेकर, बापू वळेकर, दादा पठाण, राज पठाण, श्रीराम काळे, जालिंदर गवळी, प्रकाश खाडे, फंतु गवळी, धनंजय सांगडे, विक्रम मस्के, दिनेश फरतडे, संदीप दळवे, अतुल सांगळे, विकास सांगळे, राहुल फरतडे, धनंजय वाघमारे, अभिजीत वळेकर, शहाजी कोंडलकर, स्वप्निल पाडूले आदी उपस्थित होते.

यावेळी प्राची गवळी, राणी सावंत, सागर वाघमारे व बालाजी गवळी यांचा नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक सरपंच वळेकर यांनी तर आभार विठ्ठल वरकड यांनी मानले. सूत्रसंचालन विलास दोलतोडे यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *