Lok Sabha election I have filled the gap between Amol Kolhe

पिंपरी : सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. मात्र याच दरम्यान आता दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यातच आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघात आपला प्रचार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आढळरावांनी कोल्हेंवर कडाडून टिका केली. अमोल कोल्हे यांच्यामध्येच मीपणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजित पवारांसह इतरांवर टिका करीत सुटले आहेत. असा पलटवार आढळरावांनी कोल्हेंवर केलाय. अमोल कोल्हे सध्या महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. त्यावर आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय. 

दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो, असा टोला आढळराव यांनी लगावला.  अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मात्र मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *