कल्याण लोकसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून महायुती निवडून आणणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
कल्याण मतदारसंघात शिंदे यांच्या उमेदवारीवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. मात्र हा तिढा आता सुटताना दिसत आहे. शिंदे यांना या मतदारसंघातून भाजप विजयी करेल, असे ते म्हणाले आहेत. या मतदारसंघात अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजप यांच्यासह महायुतीत असलेले सर्व घटकपक्ष शिंदे यांना विजयी करतील. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली नाही तर राजकारण सोडेल असे मंत्री रामदास कदम यांनी सांगितले होते. या मतदारसंघात वैशाली दरेकर राणे या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत येथे होणार आहे. शिंदे यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.