करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील भगवान तुळशीराम नाईकनवरे (वय ७८) यांचे आज (शनिवार) सकाळी १० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सुन व नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईकनवरे यांचे ते वडील होते.
