करमाळा (अशोक मुरूमकर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत झालेल्या सूचनेनुसार वीज वितरण कंपनीने आज (बुधवारी) देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे. संपूर्ण करमाळा शहरात मिरवणुकीवेळी अडथळा निर्माण होऊ नये व वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी सर्व लाईनची सुमारे ४० कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काम केले आहे.
गणेशोत्सव काळात मिवरणुकीत अनेक ठिकाणी वीज वाहक तारा खाली आल्याने अडथळा निर्माण होतो. त्याशिवाय लूज कनेक्शनमुळे विद्युत पुरवठा खंडीत होतो. दक्षता म्हणून शहरातील ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करण्यात आली. याशिवाय आवश्यक तेथे ऑईलही टाकण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीचे करमाळा शहर शाखाधिकारी आर. बी. शिंदे यांच्यासह वीज वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. देखभाल दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीचे १५ व ठेकेदार बंडू दुधे व बापू घरबुडे यांचे कामगार यांनी काम केले आहे.