करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये आज (मंगळवार, 26 नोव्हेंबर) सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन 74 वा संविधान दिन साजरा करण्यात आला. शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे, श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, अर्बन बँकेचे मॅनेजर एस. पी. कांबळे, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गौतम कांबळे, किसन जानराव, प्रमोद गायकवाड, भीमराव कांबळे, एल. यु. कांबळे, सुनील खरात, संतोष कांबळे, अनिकेत अडसूळ यांच्यासह सर्व केंद्रीय शिक्षिका, उपासक, उपासिका यावेळी उपस्थित होते. केंद्रीय शिक्षिका शोभा कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
संविधान दिनानिमित्त करमाळ्यात सामूहिक बुद्ध वंदना
