Primary teacher Swati Jadhav passed set examination in Education

महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट यावर्षी मार्चमध्ये घेण्यात आली. महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी युजीसी मान्यताप्राप्त नोडल एजन्सी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 38 व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र (Education) विषयामध्ये जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिका स्वाती जाधव उत्तीर्ण झाल्या आहेत.

स्वाती जाधव या सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण (ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर) येथे पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विवाह झाल्यानंतर त्यांनी डीएड केले. प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी बीए (इंग्लिश), एम. ए. (इतिहास), एम. ए. (शिक्षणशास्त्र), बी. एड., डी. एस. एम. अशा प्रकारे पदवी, पदव्युत्तर पदवी या शिक्षणाचा टप्पा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच स्वतःची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता उंचावत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथे शिक्षणशास्त्र विषयामधून डॉक्टरेट (Ph.d) साठी त्यांचे संशोधन व अभ्यास सुरु आहे. शिक्षणशास्त्र (Education) विषयामधील सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून, शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे. या निवडीबद्दल कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण येथील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांनी अभिनंदन केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *