Matoshree Panand roads were approved in Karmala taluka with the efforts of district head MaheshMatoshree Panand roads were approved in Karmala taluka with the efforts of district head Mahesh

करमाळा : तालुक्यातील चिमाजी मिरगळ वस्ती ते हिवरवाडी- वडगाव हा एक किलोमीटरचा रोड, वाशिंबे ते भैरवनाथ मंदिर एक किलोमीटर, देवळाली ते गुंड भांडाळे वस्ती एक किलोमीटर, सांगवी एक ते बिटरगाव रोड एक किलोमीटर या पद्धतीने मातोश्री ग्रामग्राम समृद्धी शेत पानंद रस्ता योजनेअंतर्गत मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून या कामाला मंजुरी मिळाली. या रस्त्यासाठी किमान दीड कोटी खर्च होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी दिलीआहे.

जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले, मातोश्री पानंद रस्ते माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी असे रस्ते करण्यासाठी रस्त्याचे वाद संपुष्टात आणून हे रस्ते तयार करून घ्यावेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी या कामाची शिफारस करून मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडूनही कामे केल्याबद्दल करमाळा शिवसेनेच्या वतीने प्रा. सावंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *