पुणे : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते व माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत पुणे येथील सिंचन भवन येथे आज (सोमवारी) बैठक झाली. करमाळा, माढा व माळशिरस या तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये करमाळा तालुक्यातील कुकडी सीना संघर्ष समितीचे ऍड. शशिकांत नरुटे उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील बंधारे, मांगी तलाव, त्यावरील कॅनलचे प्रश्न त्यांनी मांडले.
बागल गटाची सरशी, पण ‘मकाई’ची निवडणूक बिनविरोध नाहीच
करमाळा तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत भाजपचे आमदार मोहिते पाटील यांनी विधिमंडळ मुद्दा उपस्थित केला होता. कोळगाव धरण याबाबत यापूर्वीही त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आता झालेल्या बैठकीत कुकडी पाणी व सीना नदीतील बंधाऱ्यांची अवस्था यावर चर्चा झाली. सीना संघर्ष समितीच्या वतीने याबाबत निवेदनही दिले असल्याचे ऍड. नरुटे यांनी सांगितले आहे. सीना नदीवरील संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी या बंधाऱ्याचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करा, अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्यामुळे याचा विचार करा, असे नरुटे यांनी या बैठकीत सांगितले.
‘मकाई’ संदर्भात प्रा. झोळ यांच्यासह १५ जणांचे उच्च न्यायालयात याचिका
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, विशेष प्रकल्पचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ, पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे, अधीक्षक अभियंता कोल्हे, कार्यकारी अभियंता संजय बोडके, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता डुबल, जलतज्ञ अनिल पाटील, बाबाराजे देशमुख, शिवाजी कांबळे, शिवतेजसिंह मोहिते पाटील, भारत पाटील, अजित तळेकर, जगदीश अग्रवाल, सभापती प्रा. शिवाजी बंडगर, प्रकाश पाटील, गोविंद पवार, प्रतापराव पाटील, मामा पांढरे, मोहन लोंढे, जयंत पाटील, महेंद्र पाटील, अमरजित साळुंखे उपस्थित होते.
मकाईच्या निवडणुकीत भिलारवाडी, पारेवाडी, मांगी गटासह महिला राखीवसाठी रंगणार सामना
मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करणे, दहिगाव सिंचन योजना प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावित, कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यात मिळणे, सीना माढा उपसा सिंचन योजनेतून वंचित गावांना समाविष्ट करणे, फूट ब्रीज दुरुस्ती, सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बर्गे उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन तातडीने यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.