A partially burnt body was found in a car near Mangi Canal in KukdiA partially burnt body was found in a car near Mangi Canal in Kukdi

करमाळा (सोलापूर) : करमाळा मांगी रस्त्यावरील कुकडी कॅनलजवळ एका स्विफ्ट कारमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. येवला येथील ही व्यक्ती असल्याचे सांगितले जात असून श्रावण चव्हाण असे त्याचे नाव आहे. ती व्यक्ती साधारण ३५ वर्षाची आहे. सदर व्यक्ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी घटनास्थळी भेट दिली. संबंधित मृतदेहाचे करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *