करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रा. रामदास झोळ यांच्यासह १५ उमेदवारांचे ही अपील असल्याची माहिती झोळ यांनी दिली आहे. माया झोळ, प्रवीण बाबर, नंदकुमार पाटील, अण्णासाहेब देवकर, तानाजी देशमुख, सुधीर शेळके, संतोष वाळुंजकर, मारुती बोबडे, अंकुश भानवसे, अशोक जाधव, भगवान डोंबाळे, अश्विनी पालखे आदींचे हे अपील आहे.


