Misionero de Nagaraj en Shetphal inicia segunda rama en Karmala

करमाळा (सोलापूर) : एमआयडीसी येथे नागराज मशनरी या शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या पुरवठा करणाऱ्या फर्माच्या द्वितीय शाखेचा शुभारंभ विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते व उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व माजी आमदार शामलताई बागल यांच्या उपस्थितीत झाला.

जैन इरिगेशनचे अधिकृत विक्रेते असलेल्या शेटफळ येथील वैभव पोळ व किरण पोळ या बंधूंनी शेटफळ येथे नागराज मशिनरी या नावाने दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या पाईप, ठिबक सिंचन, इलेक्ट्रॉनिक मोटार व शेती उपयोगी साहित्य उपलब्ध करून देणारी पहिली शाखा सुरू केली होती. या परिसरातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी करमाळा येथील कमलादेवी औद्योगिक वसाहतीत या फर्मची दुसरी शाखा सुरू केली आहे. मान्यवरांचा उपस्थितीत या शाखेचा शुभारंभ झाला.

उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील म्हणाले, मुलांनी शेतीबरोबरच उद्योग व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्यास शेती करतात. शेतीबरोबरच शेतीपूरक उद्योग व व्यवसायामध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. याचाही विचार शेतकऱ्यांच्या मुलांनी केला पाहिजे.

ग्राहक पंचायतीचे भालचंद्र पाठक, मकाई कारखान्याचे संचालक नवनाथ बागल, अमोल यादव, माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे, आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, माजी संचालक सुरेश पोळ, जैन इरिगेशनचे किरण पाटील, आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव, विजय लावंड, शेटफळचे सरपंच विकास गुंड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पोळ, पांडुरंग लबडे, दुध संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब लबडे, मनोहर पोळ, माजी सरपंच अनिल पोळ, भारत पाटील, रणजीत लबडे, विजय लबडे, रोहित लबडे, बाबूराव चोरगे, नानासाहेब साळूंके, प्रशांत नाईकनवरे यांच्यासह बहुसंख्य लोक उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *